पुणे : नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना रस्त्यात आडवी लावलेली रिक्षा बाजूला काढण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सचिन अंबादास शेलार (२८, रा. मुंढवा) असे गुन्हा दाखल केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. शेलार याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक प्रमोद ढाकणे (वय ३५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा…पुणे कार अपघात प्रकरणी : युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धेच आयोजन, तरुणांनी शब्दातून व्यक्त केला रोष

पोलीस नियंत्रण कक्षाच्या आदेशाने हडपसर भागातील सिझन्स मॉल परिसरात रात्री नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी रस्त्यात शेलार याने रिक्षा आडवी लावली होती. पोलीस नाईक ढाकणे यांनी त्याला रिक्षा बाजूला काढण्यास सांगितले. त्यावेळी रिक्षाचालक शेलारने ढाकणे यांना धक्काबुक्की केली. त्यांना शिवीगाळ करून दगड फेकून मारला. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.