पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. बहुतांश पालेभाज्यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरेच्या दीड लाख जुडी आणि मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली. तसेच आवक घटल्याने कोबी, फ्लाॅवर, वांग्याच्या दरात वाढ झाली. टोमॅटो, गाजर, लसणाच्या दरात घट झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे : पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी चक्क मचाणावर लपले

मार्केट यार्डात रविवारी राज्य, तसेच परराज्यांतून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात ८५ ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर कोथिंबिर ८०० ते १५०० रुपये, मेथी- ५०० ते ८०० रुपये, शेपू- ५०० ते ८०० रुपये, कांदापात- ५०० ते ६०० रुपये, चाकवत- ४०० ते ७०० रुपये, करडई- ३०० ते ६०० रुपये, पुदिना- ४०० ते ७०० रुपये, अंबाडी- ४०० ते ६०० रुपये, मुळा- ८०० ते १००० रुपये, राजगिरा- ४०० ते ६०० रुयपे, चुका- ४०० ते ७०० रुपये, चवळई- ३०० ते ६०० रुपये, पालक- ८०० ते १५०० रुपये, हरभरा गड्डी- ५०० ते १००० रुपये असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune rise in vegetable prices due to increased temperature pune print news rbk 25 css