पिंपरी : बारामतीमधून पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. ‘बारामती महायुती जिंकणार’ या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिकिया दिली आहे. चर्चेला किती महत्व द्यायचे, नागपूरमध्ये लोकसभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. गडकरी वगळता भाजपच्या उमेदवाराचा पराभव होईल अशी तिथे चर्चा असल्याचे आमदार पवार म्हणाले.
पिंपरीत झालेल्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझमभाई पानसरे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, काशिनाथ नखाते आदी उपस्थित होते. बारामती भाजप जिंकणार आहे. बारामतीमधून पार्थ पवार लढणार असल्याची चर्चा आहे याबाबत विचारले असता आमदार रोहित पवार म्हणाले, चर्चेला किती महत्व द्यायचे, नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची लोकसभेला चर्चा आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वगळता भाजपच्या उमेदवाराचा पराभव होईल अशी तिथे चर्चा आहे. त्यामुळे चर्चेला काही महत्व नाही. त्यांच्यातही वेगळा संघर्ष सुरू झाला आहे. कोणाचे पालकमंत्रीपद काढले आणि कोणाला दिले यावरून संघर्ष दिसतो. हवेत बोलणाऱ्या बावनकुळे यांना त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल असे दिसते, असेही ते म्हणाले. लोकांतील लोक कधी दबावतंत्राला घाबरत नाही. घाबरलेले तिकडे गेले आहेत. लोकांशिवाय निवडून येत नाही. लोक शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे तिकडे गेलेले काही लोक संपर्कात आहेत. तेथील अनेकांची चलबिचल चालली आहे. त्यांच्यात अस्वस्थता आहे. ते लवकरच आमच्याकडे येतील असेही ते म्हणाले.