पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबवली जात असल्याने राज्यभरातील पालकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. तीन दिवसांतच ७३ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. मात्र शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करून केवळ शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खासगी, स्वयंअर्थसहाय्यित शाळा या प्रक्रियेतून वगळल्या गेल्या होत्या. या बदलास पालक, शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने या बदलास स्थगिती दिली. त्यामुळे शिक्षण विभागाला पुन्हा जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी लागत आहे. त्यानुसार राज्यभरातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ६३४ जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत.

हेही वाचा : धक्कादायक : प्रेयसीने संपर्क तोडल्याने तिच्या बहिणीवर गोळीबार

education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
unemployed youth cheated under mukhyamantri yuva karya prashikshan yojana
भंडारा : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील शेकडो बेरोजगारांची फसवणूक!
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?

आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल केल्यानंतर शिक्षण विभागाने नोंदणी सुरू केली. त्यात सुमारे ६८ हजार पालकांनीच प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरून नोंदणी केली होती. त्यामुळे खासगी शाळा, विशेषत: खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रवेश प्रक्रियेत नसल्याचा परिणाम नोंदणीवर झाल्याचे चित्र होते. मात्र आता जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याने खासगी शाळा, इंग्रजी शाळांचा या प्रवेश प्रक्रियेत समावेश झाला आहे. त्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुरू होताच राज्यभरातून पालकांची नोंदणी सुरू झाली असून, तीन दिवसांतच ७३ हजारांहून अधिक ऑनलाइन अर्जांची नोंदणी झाली आहे. त्यात पुणे, नागपूर, नांदेड, गोंदिया अशा काही जिल्ह्यांमध्ये उपलब्ध प्रवेश क्षमतेइतके अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत अर्जसंख्येत भर पडणार असल्याने प्रवेशाठी चुरस होणार असल्याचे चित्र आहे.

Story img Loader