पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबवली जात असल्याने राज्यभरातील पालकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. तीन दिवसांतच ७३ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. वंचित, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. मात्र शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करून केवळ शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खासगी, स्वयंअर्थसहाय्यित शाळा या प्रक्रियेतून वगळल्या गेल्या होत्या. या बदलास पालक, शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने या बदलास स्थगिती दिली. त्यामुळे शिक्षण विभागाला पुन्हा जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी लागत आहे. त्यानुसार राज्यभरातील ९ हजार १३८ शाळांमध्ये १ लाख २ हजार ६३४ जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा