पुणे : म्हात्रे पूल परिसरात एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याचा दूरध्वनी पोलीस नियंत्रण कक्षाला बुधवारी रात्री करण्यात आला. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तेव्हा एका अल्पवयीनाने पोलिसांना दूरध्वनी करुन दिशाभूल केल्याचे उघडकीस आले.
हेही वाचा : गिग कामगारांचा उद्या संप! स्विगी, झोमॅटोसह इतर ऑनलाइन डिलिव्हरी सेवा ठप्प होणार
u
म्हात्रे पूल परिसरात एका खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाडीजवळ थांबलेल्या तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती दूरध्वनीद्वारे अलंका पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गोळीबाराची माहिती देणारा दूरध्वनी एका अल्पवयीनाने केल्याचे उघड झाले. पोलिसांनी मुलाच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. ऐन दिवाळीत गोळीबाराची माहिती मिळाल्याने पोलिसांची धावपळ उडाली.