पुणे : महायुतीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटामध्ये लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. पण आम्ही लहान आहोत. आमचाही विचार व्हावा. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढविण्यास इच्छुक असून, हा मतदारसंघ माझ्यासाठी सोडावा, अशी मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खोत म्हणाले, की आगामी लोकसभा निवडणूक महायुती एकदिलाने लढविणार आहे. नरेंद्र मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. हे खरे असले, तरी आमच्यासारख्या लहान पक्षाचा विचार होण्याची गरज आहे. महायुतीत फक्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट यांमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. पण मी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. आम्ही लहान असलो, तरी महायुतीच्या नेत्यांनी आमचा विचार करावा.

हेही वाचा : आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अॅड.राजेंद्र उमाप यांची निवड

हातकणंगल्याचे विद्यमान खासदार शिवसेनेचे धैर्यशील माने आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत विचारले असता खोत म्हणाले, मागील निवडणुकीवेळी आम्ही मतदारसंघात मशागत केली होती. त्याचा फायदा माने यांनी झाला. आता त्यांनी आम्हाला मदत करावी. महाआघाडीत हातकणंगले मतदारसंघातून माजी खासदार राजू शेट्टी पुन्हा उभे राहण्याची शक्यता आहे. त्याबाबत खोत म्हणाले, की मी राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवित नाही, तर शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी निवडणूक लढविणार आहे. खोत यांच्या मागणीमुळे हातकणंगले मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune sadabhau khot willing to contest lok sabha election from hatkanangale constituency pune print news dbj 20 css