पुणे : ससून रुगणालयातून अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटीलचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत असून, पोलिसांनी ससून रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. येरवडा कारागृहातून ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झालेला पाटील फेरफटाका मारण्याच्या नावाखाली रुग्णालयातून बाहेर पडायचा. पुणे स्टेशन परिसरातील तारांकित हाॅटेलमध्ये तो मुक्कामही करायचा, अशी धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाटील याला दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल याला गेल्या शनिवारी (३० सप्टेंबर) रुग्णालयाच्या परिसरात गुन्हे शाखेने पकडले. ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहात काम करणारा रौफ शेख याच्यामार्फत मंडल पाटीलला अमली पदार्थ देणाार होता. पाटील रुग्णालयातून अमली पदार्थ विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर पाटील रुग्णालयात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये आता ठाकरे गटाचे ‘होऊ द्या चर्चा’ अभियान

पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर कोणत्या दिशेने गेला, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पडताळणी केली. पसार झाल्याानंतर तो स्टेशन परिसरातील एका तारांकित हाॅटेलमध्ये गेला होता. या हाॅटेलमध्ये पाटील याच्या नावाने एक खोली आरक्षित करण्यात आली होती. पाटील नेहमीप्रमाणे बाहेर फेरफटका मारण्यासाठी पडला असावा, असे बंदोबस्तावरील पोलिसांना वाटले. पाटील पसार झाल्यानंतर तो परतला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune sassoon hospital drug peddler lalit patil escaped from police custody stays in luxury hotel near pune station pune print news rbk 25 css