पुणे : हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत माजविणारा गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांची पोलिसांनी शनिवारी धिंड काढली. टिपू पठाण आणि साथीदाराविरुद्ध एका महिलेची जमीन बळकाविल्याप्रकरणी नुकताच काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सय्यदनगर भागात रिझवान उर्फ टिपू पठाणची दहशत आहे. पठाणे याने एका कार्यक्रमात नोटांची उधळण केल्याची घटना नुकतीच घडली होती. समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित केली होती. समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी पठाणसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पठाण आणि साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकाविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. संबंधित महिलेने काळेपडळ पोलिसांकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, एजाज युसूफ इनामदार, नदीम बाबर खान यांना अटक करण्यात आली होती.
पुणे : हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत माजविणारा गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांची पोलिसांनी शनिवारी धिंड काढली. टिपू पठाण आणि साथीदाराविरुद्ध एका महिलेची जमीन बळकाविल्याप्रकरणी नुकताच काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. pic.twitter.com/TwSYGBGa5S
— LoksattaLive (@LoksattaLive) April 12, 2025
त्यानंतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पठाण याच्यासह साथीदारांची सय्यदनगर भागात धिंड काढली. पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पथकाने ही कामगिरी केली. पटाण याने नागरिकांना धमकावून खंडणी उकळणे, तसेच जमीन बळकाविल्याचे गुन्हे केल्यास तक्रार करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक पाटील यांनी केले आहे.