पुणे : वारजे माळवाडी भागातील एका नामवंत शाळेतील नृत्य शिक्षकाने ११ वर्षांच्या विद्यार्थ्यासह अन्य विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे. नृत्य शिक्षकाविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नृत्य शिक्षकाला न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, नृत्य शिक्षकाने बालकांवर अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी नृत्य शिक्षकाविरुद्ध मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शिक्षकाला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. नृत्य शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांवर अत्यचाार केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध दोन स्वतंत्र गु्न्हे दाखल करण्यात आले. त्याने आणखी काही विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, सखोल तपास करायचा आहे. अत्याचार प्रकरणात दाखल केलेल्या दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपास करायचा आहे. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने शिक्षकाला २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : पिंपरी : घटस्फोटाच्या केसमध्ये मदत करीत असल्याच्या संशयावरून मोटारीवर दगडफेक

समुदेशानामुळे प्रकार उघड

दोन वर्षापासून आरोपी शिक्षक मुलांशी अश्लील कृत्य करत होता. त्याने मोबाइवर चित्रीकरण केले होते. विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी शाळेत समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना योग्य आणि अयोग्य स्पर्शाबाबतची याबाबतची देण्यात येते. समुपदेशनात अत्याचार प्रकरणात वाचा फुटली आरोपी नृत्य शिक्षक पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होता. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शालेय प्रशासनाला जाब विचारला. या घटनेची गंभीर दखल घेऊन शिक्षकाला काढून टाकण्यात आले.

Story img Loader