पुणे : शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे. किशोर परमेश्वर केदार (वय २३), नकुल परमेश्वर केदार (वय २१, दोघे रा. गोसावी वस्ती, हॅप्पी काॅलनी, कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शाळकरी मुलीने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी शिकवणीला जायची. आरोपी नकुल तिची छेड काढायचा.

हेही वाचा : नवले पूल परिसरात पुन्हा अपघात; टेम्पो उलटून एकाचा मृत्यू

Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
Mumbai High Court
“मुलीने हॉटेलची खोली बुक केली म्हणजे तिची शारीरिक संबंधांना संमती आहे असे नाही,” उच्च न्यायालयाचं परखड मत!
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना

छेडछाडीमुळे घाबरलेल्या मुलीने नकुलचा मोठा भाऊ किशोर याच्याकडे तक्रार केली. किशोरने मुलीला धमकावून तिला एका घरात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. माझ्या भावाची तक्रार केल्यास तुला जीवे मारु, अशी धमकी दिली. मुलीला जातीवाचक शिवीगाळ केली. मुलीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन किशोर आणि नकुल यांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.