पुणे : बनावट तुकडी दाखवून सरकारी अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तत्कालीन उपशिक्षणाधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तत्कालीन उपशिक्षणाधिकारी दिलीप थोरे, भोसरी येथील सु. ना. बारसे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना लढे आणि संस्था व्यवस्थापक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उपशिक्षणाधिकारी अनंत दाणी (वय ५२) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे बारसे विद्यालयातील तुकडी अनुदानाबाबत तक्रार करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग; २४ तासात १०० मिलिमीटरची नोंद

मुख्याध्यापकांनी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केली. तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी न करता मान्यतेचे आदेश दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. बारसे विद्यालयात कोणत्याही तुकड्या वाटप झालेल्या नव्हत्या. उपशिक्षणाधिकारी पांडुरंग थोरे यांच्या स्वाक्षरीने मान्यता देण्यात आली, असे चौकशीत आढळून आले. प्रभारी मुख्याध्यापकांनी तीन कर्मचाऱ्यांना विनाअनुदानित तत्वावर मान्यता देण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यानंतर चौकशी समितीने तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते.