पुणे : मुठा नदीच्या पूना हॉस्पिटलजवळील पात्रात सोमवारी सायंकाळी एक शाळकरी मुलगा वाहून गेला. वाहून गेलेल्या मुलाचा शोध लागला नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून मंगळवारी सकाळी मुठा नदीपात्रात बुडालेल्या शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. मुठा नदीपात्रात संगम पूल, डेंगळे पूल परिसरात मुलाचा शोध घेण्यात येत आहे.

खडकवासला धरण साखळीत संततधार असल्याने रविवारी रात्री मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर सोमवारी सकाळी भिडे आणि शिवणेमधील पूल पुन्हा पाण्याखाली गेला. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भिडे पुलावरून पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस तात्पुरते कठडे उभे करून पूल वाहतुकीस बंद केला होता.

Library at CBD Police Station
सीबीडी पोलीस ठाण्यात अभ्यासिका
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
youths attacked with weapons in pune over dispute during dancing
पुणे : विसर्जन मिरवणुकीत नाचताना झालेल्या वादातून तरुणांवर शस्त्राने वार – पोलिसांकडून तीन गुन्हे दाखल
Violation of noise rules, Kolhapur, noise Kolhapur,
कोल्हापुरात मिरवणुकीत ध्वनी नियमांचे उल्लंघन
after nephew shocked while dancing group of people beat up uncle with stone
पुणे :नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण
buffaloes dies due to lightning strike in dam
पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने बंधार्‍यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा दुर्दैवी मृत्यू
Kharadi, decapitated body, young woman, Mula-Mutha riverbed, police investigation, drone cameras, submarines, Chandannagar police station, missing persons,
शिर धडावेगळे केलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे अवयवांच्या शोधासाठी मोहीम, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे मुठा नदीपात्रात शोध मोहिम
Wardha, state government schemes,ladki bahin yojana, utensil distribution, construction workers, political pressure, Hinganghat taluka, Deoli taluka, Sena Thackeray group, chaos, administration,
वर्धा : बहिणी लाडक्या मतदार नसल्याने वंचित, भांडी न मिळाल्याने हिरमुसल्या

हेही वाचा : मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी

पूना हॉस्पिटलजवळील एसएम जोशी पुलाच्या पात्रातही मोठ्या प्रमाणावर पाणी होते. तेथील एका बाकड्यावर एक शाळकरी मुलगा बसला होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो अचानक नदीपात्रात पडला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अनेकांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तातडीने अग्निशामक दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. या दलाच्या जवानांनी तातडीने मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. महापालिका भवन, डेंगळे पूल, संगम पूल परिसरातील नदीपात्रात जवानांकडून शोध घेण्यात येत आहे.