पुणे : राज्य सरकारतर्फे दुसरे विश्व मराठी संमेलन २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च असे तीन दिवस पुण्यात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी केली. या संमेलनासाठी आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत सामंत बोलत होते. विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी भाषा विभागाचे अवर सचिव नितीन डंगारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक तथा विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. शामकांत देवडे, भाषा संचालक विजया डोणीकर, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, विभागाच्या कक्ष अधिकारी ऐश्वर्या गोवेकर या वेळी उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पुणे : वाघोली अपघात प्रकरणात डंपर मालक अटकेत

राज्यभाषेला अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या राज्यांप्रमाणे मराठी भाषेसाठी केंद्र सरकारकडून अधिकाधिक निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा. देशातील सर्व बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळांना आमंत्रित करून मराठी भाषेसाठी काय योगदान देता येईल, यासाठी त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात. सर्व महाविद्यालयात मराठी भाषा विभागाची प्रकाशने ठेवण्यासाठी, सर्व विद्यापीठातील मराठी भाषा विभागात मराठी भाषा संशोधन केंद्र स्थापनेसाठी प्रस्ताव करावेत, असे सामंत यांनी सांगितले. तसेच राज्यस्तरावर महिला साहित्य संमेलन, तसेच विभागनिहाय युवा साहित्य संमेलन आयोजनाची सूचनाही सामंत यांनी केली. पुस्तकांचे गाव या संकल्पनेच्या अनुषंगाने कवितांचे गाव या संकल्पनेवरही काम करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले. त्यामुळे आता कवितांचे गाव साकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे.