पुणे : सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवारी (७ एप्रिल) आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील केंद्रांवर ही परीक्षा होणार असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने होणारी ही शेवटची परीक्षा ठरणार आहे.

सहायक प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (नेट) धर्तीवर राज्यस्तरावर सेट परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या माध्यमातून ही परीक्षा होते. गेल्यावर्षी या परीक्षेसाठी एक लाख १९ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. तर यंदा १ लाख २८ हजार २४३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील १७ शहरांतील २८९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. या परीक्षेची तयारीची तयारी सेट विभागाने केली आहे.

tet conducted by Maharashtra State Examination Council has been declared final result
टीईटीचा अंतरिम निकाल जाहीर
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Why is there a delay in the appointment of candidates who have passed MPSC
कोलमडलेले वेळापत्रक, न्यायालयीन विलंब, लालफीतशाही… ‘एमपीएससी’ उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का होतो?
format of Law CET exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
How to Practice Mock Tests For Exams
SBI PO & Clerk Exam Tips : परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत? मग मॉक टेस्टचा ‘असा’ करा सराव
Changes in the format of the NEET question paper
‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल
SET Examination Scheduled For 15th June Via Offline Mode
सेट परीक्षा लांबणीवर, आता कधी होणार परीक्षा?
UPSC CSE 2025 Exam Notification
UPSC CSE 2025 Exam Notification : UPSC कडून नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जारी! गेल्या ३ वर्षांतील सर्वात कमी जागांची जाहिरात

हेही वाचा : आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत आणला खेकडा? ‘पेटा इंडिया’ने केली ‘ही’ मागणी

आतापर्यंत सेट परीक्षा पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने घेण्यात येत होती. मात्र आता नेटच्या धर्तीवर सेट परीक्षाही संगणकआधारित पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी पारंपरिक पद्धतीने होणारी सेट परीक्षा शेवटची ठरणार आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

Story img Loader