पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना उद्धव ठाकरे गटाने दे धक्का दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तळेगाव येथे शिवबंधन बांधले. यावेळी आमदार सचिन अहिर, मावळचे संघटक संजोग वाघेरे, अमोल पवार, बाळासाहेब फाटक, आशिष ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शैलेश मोहिते यांनी माजी सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस अशी पदे भूषविली आहेत.

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीस आणि जिमचा काही संबंध नाही”, आदित्य ठाकरेंचा फडणवीस यांना टोला

Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
sillod assembly constituency uddhav thackeray campaign for suresh bankar maharashtra assembly elections 2024
ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
Sharad Pawar and Raj Thackeray meeting in Khadakwasla and Hadapsar Constituency
हडपसर, खडकवासला मतदारसंघात पवार ठाकरेंच्या तोफा धडाडणार, एकमेकांना काय उत्तर देणार !
maharashtra assembly election 2024 amit thackeray sada saravankar mahesh sawant dadar mahim assembly constituency
लक्षवेधी लढत : दोन्ही ठाकरेंसाठी वर्चस्वाची लढाई

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड राजगुरूनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी धक्का दिला. शैलेश मोहिते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. यापूर्वी पिंपरी- चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनाही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचलं होतं. मावळ लोकसभेत वाघरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना धक्का दिला आहे.

हेही वाचा : मराठा मोर्चासाठी कडक बंदोबस्त; एक हजार पोलिसांसह दंगलनियंत्रक पथक तैनात

शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील कोण आहेत?

  • आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे
  • माजी सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस</li>
  • माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस
  • माजी राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
  • निरीक्षक- उत्तराखंड, झारखंड, छ्तीसगड, लक्षद्वीप