पुणे : टोलचा मुद्दा काढून महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेच्या मुद्द्यावरील लक्ष कोणी भटकवू नये. सध्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, टोलचा नव्हे. उगाच शिळ्या कडीला उत आणण्यात काही अर्थ नाही, असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या मनसेला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. त्या पुण्याच्या वडगाव मावळमध्ये बोलत होत्या. वडगाव मावळ या ठिकाणी जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांकडून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे. त्यांच्या साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सुषमा अंधारे यांनी भेट दिली. कामगारांचा प्रश्न लवकर न सोडवल्यास येत्या १२ तारखेला आम्ही तळेगाव एमआयडीसीला ताळे लावू असा इशाराही त्यांनी दिला आहे. अंधारे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पुणे लोकसभा प्रियांका गांधी लढणार का? नाना पटोले म्हणाले, “हायकमांड…”

हेही वाचा : अण्णा हजारे यांच्याविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस

राज्यातील आरोग्य व्यवस्था ही व्हेंटिलेटरवर गेलेली आहे. पुण्यातील ससून असो की जळगाव, नाशिक येथील परिस्थिती. वर्षभराचं हाफकीनचं २२६ कोटींचं बिल आरोग्यमंत्र्यांनी वेळेत दिल असतं तर त्या-त्या संबंधित रुग्णालयाला औषध पुरवठा झाला असता आणि हे बळी गेले नसते, असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं आहे. त्या पुढे म्हणाल्या की, हे बळी शासकीय हलगर्जीपणामुळे गेलेले असून आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. हे सर्व सुरू असताना काही जण शिळ्या कढीला ऊत आणत असून त्याचा काहीच अर्थ नाही, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मनसेला टोला लगावला आहे. तीस लाखांची गाडी घेणारा व्यक्ती फिरू शकतो तर तो ५० ते ३० रुपयांचा टोलही भरू शकतो. सध्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तो मुद्दा आम्हाला सोडायचा नाही. सरकारचा तो मुद्दा डायव्हर्ट करू द्यायचा नाही. त्यासंबंधीचा मुद्दा काही कंत्राटदार डायव्हर्ट करून सरकारला मदत करत आहेत, असंही अंधारे म्हणाल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune shivsena leader sushma andhare criticize raj thackeray on toll issue says health care system of state is on ventilator kjp 91 css