पुणे : मद्यधुंद शिवशाही बसचालकाने मोटारीला धडक दिल्याची घटना गोळीबार मैदान चौकात घडली. याप्रकरणी बसचालकाला वानवडी पोलिसांनी अटक केली. महेश शिवाजी पुंड (वय ३२, रा. महालक्ष्मी हिवरेता, नेवासा, जि. नगर) असे अटक करण्यात आलेल्या शिवशाही बस चालकाचे नाव आहे. याबाबत वाहक राम मधुकर चिते (वय ३५, रा. पिंपळगाव हरे, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुंड पिंपरी-चिंचवड आगारात चालक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी…

बुधवारी सकाळी तो हैदराबादला प्रवाशांना घेऊन निघाला होता. एसटी बसमध्ये बिघाड झाल्याने बस घेऊन तो स्वारगेट आगारात आला. स्वारगेट आगारातील शिवशाही बस घेऊन निघाला होता. बसमध्ये १३ प्रवासी होते. गोळीबार मैदानात बसने एका मोटारीला धडक दिली. त्यावेळी बसचालक पुंड आणि मोटारचालकात वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी पुंडला ताब्यात घेतले. पुंडची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीत पुंडने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. मद्य पिऊन वाहन चालवणे, तसेच प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी पुंडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वानवडी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune shivshahi bus hit a motor case registered against st driver pune print news rbk 25 css