पुणे : घर नावावर करून देण्यास नकार दिल्याने आईच्या डोक्यात खुर्ची मारणाऱ्या मुलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मुलगा कपिल दीपक सकट, त्याची पत्नी पायल कपिल सकट (वय २६, दोघे रा. निम्हण मळा, पाषाण) याच्यासह सासू आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत यशोदा दीपक सकट (वय ५५, रा. जनवाडी, गोखलेनगर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : केशर आंबा यंदा महिनाभर आधीच बाजारात; मुंबई, पुण्यात दर किती ?

यशोदा सकट यांचा मुलगा कपिल, त्याची पत्नी पायल, तिची आई आणि मेहुणा राहते घर नावावर करून देण्यासाठी त्रास देत होते. दोन दिवसांपूर्वी कपिल आणि त्याची आई यशोदा यांच्यात वाद झाला. वादातून त्याने आई यशोदा यांच्या डोक्यात खुर्ची मारून शिवीगाळ केली. मारहाणीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune son beats mother for property pune print news rbk 25 css