पुणे : कुंपणाच्या वादातून जमीन मालक महिलेला धमकावून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिजित शिवरकर यांच्यासह १५ जणांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अभिजीत बाळासाहेब शिवरकर, भास्कर रत्नाकर गायकवाड, त्यांची पत्नी, मुलगा, राजेश खैरालिया, किरण छेत्री (रा. वानवडी गाव) यांच्यासह दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध आणि तरुणी गर्भवती होताच…

वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन परिसरात महिलेची वडिलोपार्जित जागा आहे. फिर्यादी महिला वारस आहेत. त्यांनी भूमापन अधिकाऱ्याकडून सरकारी मोजणी केली होती. त्याठिकाणी कुंपण घालण्याचे काम सुरू होते. त्यावेळी शिवरकर यांनी कामगारांना रोखले. लोखंडी खांब काढून टाकले. आम्ही जमीन मालक आहोत, असे सांगून शिवरकर आणि गायकवाड यांनी महिलेला शिवीगाळ केली. त्यांना जागेच्या परिसरातून हाकलून लावले. पुन्हा या परिसरात दिसल्यास जीवे मारु, अशी धमकी दिली.