पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गुरुवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या बैठकीसाठी ते उपस्थित राहणार आहेत. त्याकरिता नड्डा यांना राज्य विशेष अतिथीचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबत राजशिष्टाचार खात्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला बुधवारी कळविण्यात आले. त्यामुळे नड्डा यांच्यासाठी स्वागतापासून निवास, भोजन, वाहन व्यवस्था अशी सर्व शासकीय बडदास्त ठेवण्यात येणार आहे. राज्यात भेट देणारे केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, अन्य राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, सैन्यदलाचे प्रमुख, सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, विविध सरकारी यंत्रणांचे प्रमुख यांना राज्य अतिथीचा दर्जा दिला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पुण्यात जप्त केलेल्या पाच कोटींच्या अमली पदार्थांची होळी

याशिवाय अन्य कोणाला अतिथीचा दर्जा द्यायचा असल्यास तो निर्णय राज्य सरकारकडून घेतला जातो. त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना त्यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त हा दर्जा देण्यात आला आहे. नड्डा हे संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या बैठकीसाठी पुण्यात येणार आहेत. ही बैठक स. प. महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे. नड्डा हे दिल्लीतून विमानाने लोहगाव विमानतळावर उतरणार आहेत. त्यानंतर ते थेट स. प. महाविद्यालयात बैठकीकडे रवाना होणार आहेत. गुरुवारी नड्डा यांचा पुण्यातच मुक्काम असणार आहे. शुक्रवारी सकाळी ते विमानाने दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत. नड्डा यांना राज्य विशेष अतिथीचा दर्जा देण्यात आल्याने जिल्हा राजशिष्टाचार विभागाकडून त्यांच्यासाठी निवासाची खास सोय करण्यात आली आहे. याशिवाय त्यांचे भोजन आणि वाहनाची सोय देखील करण्यात आली आहे.