पुणे : भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी सुसंगत श्री गणाधीश रथामध्ये विराजमान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नियोजित वेळेपूर्वी गुरूवारी मार्गस्थ झाला. दरवर्षी मिरवणुकीला होणारा उशीर लक्षात घेता यंदा बेलबाग चौकातून दुपारी चार वाजता मंडळाची मिरवणूक सुरू करण्यात आली. लक्ष्मी रस्त्याने गणपती मार्गस्थ झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Pune Ganesh Visarjan 2023 Live : मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचे दुपारी साडेचार वाजता विसर्जन

उपमुख्यमंत्री अजित पवार विसर्जन मिरवणुकीला येणार होते मात्र ते मुंबईत असल्याने येऊ शकले नाहीत. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विसर्जन मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी आहे. प्रभात, दरबार ही बँडपथके, स्व-रूपवर्धिनीचे ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडांची मंडळाला साथ आहे