पुणे : भारतीय जनता पक्षाच्या ‘महाविजय २४’ या अभियाना अंतर्गत पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भिमाले यांना गुरूवारी पुण्यात दिले. प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, जगदीळ मुळीक यावेळी उपस्थित होते. भिमाले यांनी १९९८ साली भाजपा युवा मोर्चामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सन २००२ मध्ये पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते विजयी झाले. सन २०१२ साली पुणे शहर सरचिटणीस आणि २०१७ साली पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची धुराही त्यांनी सांभाळली आहे.

हेही वाचा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पुण्यात दाखल

Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nitin Gadkari Kothrud , Chandrakant Patil,
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
navneet rana
अमरावती जिल्‍ह्यात उपद्रवमूल्‍य वाढविणारा प्रयोग
maharashtra assembly election 2024 , manoj jarange,
आरक्षणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या घनसावंगीमध्ये मनोज जरांगे कोणाच्या बाजूने ?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिमाले यांना ही जबाबदारी मिळाली आहे. शिवाय पुणे लोकसभा अंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणूनही भिमाले यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. नियुक्तीबाबत भिमाले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी आणि पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्याचा प्रयत्न आहे. पुणे लोकसभेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल. यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस आहे. संघटनेत मिळालेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पडली असून नवी जबाबदारीही पूर्ण क्षमतेने आणि समर्पण भावनेतून निभावली जाईल’.