पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील ‘प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड’ या दुव्याद्वारे लॉग इनचा वापर करून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाइन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नरेंद्र मोदी यांच्या गावातील शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार विशेष प्रशिक्षण

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. त्यात राज्य मंडळांनी ऑनलाइन गुण भरण्याबाबतची कार्यपद्धती देण्यात आली आहे. राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. त्यामुळे प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय लगेचच लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा : लोणावळ्यातील हॉटेल मॅनेजिंग डायरेक्टरने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग; गुन्हा दाखल

प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देऊन शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळांने कळवलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येणार आहे. नियमित कालावधीमध्ये गैरहजार असलेल्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षेसाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालये, शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांचे गुणही ऑनलाइन पद्धतीनेच नोंदवावे लागणार आहेत. अधिक माहिती http://www.mahahssboard.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune state board decision to fill up marks of 10 th 12 th practical exam through online process pune print news ccp 14 css