लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: दुपारी तीन पासून शहराच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारनंतर आकाश ढगाळ झाले आणि मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.

पाषाण परिसरातून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर बावधन, बाणेर, कोथरुड, कर्वे नगर, वारजे, शिवाजी नगर, डेक्कन, स्वारगेट परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. सिंहगड रस्ता आणि तळजाई सारख्या काही भागांमध्ये गारा पडल्या. शहरातील विविध भागांमध्ये सुमारे एक तासभर वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने दाणादाण उडवली.

आणखी वाचा- वैविध्यपूर्ण मोटारींचा ताफा पाहण्यासाठी पुणेकर रस्त्यावर; ‘व्हिंटेज आणि क्लासिक कार रॅली’ला उदंड प्रतिसाद

शहराच्या बाहेर उपनगरांमध्ये आणि लगतच्या ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी साडेपाचपर्यंत मुळशी गिरिवन परिसरात ८.५ मिलिमीटर, वडगावशेरी भागात सात मिलिमीटर, कोरेगाव पार्क परिसरात तीन तर मगरपट्टा आणि आंबेगाव भागात अडीच मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे पुणे वेधशाळेने कळवले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune stormy winds and rain with hail pune print news bbb 19 mrj
Show comments