पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू झाले असतानाच सिंहगड रस्त्याला पर्यायी ठरणाऱ्या सनसिटी-कर्वेनगर नदीवरील उड्डाणपुलाचे काम रखडले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सनसिटी-कर्वेनगर पुलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, काम दिलेली कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने फेरनिविदा काढण्यात आली असून, निविदेला मंजुरी मिळाल्यानंतरही पुलाचे काम सुरू झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीही कायम राहिली आहे.

कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता दरम्यानच्या राजाराम पुलावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सिंहगड रस्ता सनसिटी येथून कर्वेनगरपर्यंत पूल प्रस्तावित आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकातही यासाठी तरतूद करण्यात आली आहे. उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्ता आणि कर्वेनगर ही दोन उपनगरे काही मिनिटांत एकमेकांशी जोडली जाणार आहेत. या उड्डाणपुलासाठी महापालिकेने ३७ कोटींच्या खर्चाचा आराखडा केला असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Ganja smuggling near Mohol, Solapur, Ganja,
सोलापूर : मोहोळजवळ गांजाची तस्करी; दोन महिलांसह चौघे अटकेत
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
pune four pistols and two bikes seized
कोंढव्यात तिघांकडून चार पिस्तुले, दोन दुचाकी जप्त
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?

हेही वाचा : ससूनमध्ये पुन्हा तोच खेळ! महिनाभरात तिसऱ्या अधीक्षकाची नियुक्ती

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यान उड्डाणपुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर सनसिटी-कर्वेनगर पुलासाठी आवश्यक भूसंपादनाची रखडलेली प्रक्रिया महापालिका प्रशानसाकडून सुरू करण्यात आली होती. खासगी जागामालकांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेने कामाची निविदा प्रक्रिया राबविली होती. त्याला स्थायी समितीच्या ३ मे रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काम मिळालेली कंपनी दिवाळखोरीत गेल्याचे स्पष्ट झाल्याने महापालिका प्रशासनाकडून फेरनिविदा राबविण्यात आली. त्यानुसार विजय पटेल यांच्या कंपनीला उड्डाणपुलाचे काम देण्यात आले आहे.

हेही वाचा : पुणे मेट्रो निगडीपर्यंत सुसाट! स्वारगेट ते कात्रज मेट्रोला मात्र ब्रेक

मात्र अद्यापही काम सुरू झालेले नसल्याची वस्तुसथिती आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा भार कायम राहिला असून, उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. प्रस्तावित पुलामुळे सिंहगड रोड, कोथरूड आणि कर्वेनगरमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. काही दिवसांपूर्वी कोथरूडचे आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांची भेट घेतली होती. उड्डाणपुलाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

हेही वाचा : पिंपरीत क्षेत्रीय कार्यालयांतर्गत गणेशमूर्ती संकलन केंद्र

३० मीटर रुंदीचा उड्डाणपूल

जोडरस्त्यासह ३५० मीटर लांबीचा आणि ३० मीटर रुंदीचा हा उड्डाणपूल असून, त्याचे काम चोवीस महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. सिंहगड रस्ता, कोथरूड आणि कर्वेनगर या दरम्यानच्या राजाराम पुलावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाणपूल उपयुक्त ठरणार आहे. उड्डाणपूल उतरण्याच्या ठिकाणची जागा खासगी असल्याने भूसंपादन रखडले होते. मात्र, खासगी जागामालकांनी जागा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानसुार सध्या ९५ टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. उर्वरित जागेचे भूसंपादन करण्यासाठी साडेसात कोटींची तरतूद महापालिकेने केली आहे. या खर्चालाही महापालिकेने मान्यता दिली आहे.