पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री पदावर विराजमान झाले. अजित पवार यांनी अचानकपणे घेतलेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्या घटनेला बराच कालावधी उलटून गेला आहे. त्या दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा निवडणुक लढवली. या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र अखेर या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. त्यानंतर पुढील अगदी काही दिवसांत सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Pooja Khedkar : “अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणं शक्य नाही”, पूजा खेडकर यांची मागणी रुग्णालयाने फेटाळली होती!

या संपूर्ण कालावधीत पवार कुटुंबीय एकमेकांना भेटल्याचे दिसून आले नाही. त्याच दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर भागातील मोदी बागेतील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी सकाळच्या सुमारास सुनेत्रा पवार यांनी या दोघांची जवळपास तासभर भेट घेतली. यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.

छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी काल (१५ जुलै) शरद पवार यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, भेटीनंतर छगन भुजबळांनी याबाबत प्रतिक्रिया देत आपली ही राजकीय भेट नसून राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवर असल्याचे सांगितले होते. या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी शरद पवार व सुप्रिया सुळेंची निवास्थानी जाऊन भेट घेतली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune sunetra pawar meet sharad pawar and supriya sule svk 88 css