पुणे : तलाठी भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना येण्यास अवघा एक मिनीट उशीर झाल्याने पुण्यातील रामटेकडी येथील परीक्षा केंद्रात उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आला. सकाळी नऊ वाजता परीक्षा सुरू होणार असल्याने ८.४५ वाजता उमेदवारांनी येणे अपेक्षित होते. मात्र, त्यानंतर आलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्राच्या फाटकावरच अडविण्यात आल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. रामटेकडी येथील सहयोग डिजिटल हब या खासगी परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पिंपरीत पाच हजार ४५९ ठिकाणी आढळल्या डासांच्या अळ्या

उमेदवारांनी परीक्षेला दीड तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. या वेळेत परीक्षेचा अर्ज भरलेलाच उमेदवार परीक्षा देण्यासाठी आला आहे किंवा कसे याची बायोमेट्रिक तपासणी करण्यात येते. याबाबत परीक्षेचा अर्ज भरताना आणि परीक्षेच्या प्रवेशिकेवर लेखी कल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे विहित वेळेत न आलेल्या उमेदवारांना प्रवेश दिला जात नसल्याचे स्पष्टीकरण भूमी अभिलेखकडून देण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune talathi exam candidates denied entry due to one minute late at exam centre pune print news psg 17 css
Show comments