पुणे : नवउद्यमींना उद्योग सुरू करण्यापासून तो यशस्वी करण्यापर्यंतचे धडे ‘टायकॉन २०२५’ परिषदेत मिळणार आहेत. विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजक या परिषदेत नवउद्यमींना मार्गदर्शन करणार आहेत. नवउद्योजकतेसाठी समर्पित असलेल्या द इंडस आंत्रप्रेन्युअर्स (टीआयई) या संस्थेने २१ व २२ फेब्रुवारीला या परिषदेचे आयोजन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टायकॉन परिषदेत प्रमुख एंजल गुंतवणूकदार, स्टार्ट अप फंड्स, उद्योजक आणि उद्योग विचारवंतांसह सुमारे ४०० ते ५०० जण सहभागी होणार आहेत. ही परिषद कोरेगाव पार्कमधील हॉटेल वेस्टीन येथे होणार आहे. या दोन दिवसीय परिषदेमध्ये पहिल्या दिवशी नवउद्योजकतेच्या महत्त्वाच्या पैलूंवर व व्यावहारिक उदाहरणांसह मास्टर क्लास व सत्रांचा समावेश असेल. दुसऱ्या दिवशी नवउद्योजकतेला प्रेरित करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, गुंतवणूकदारांचे मार्गदर्शन या सत्रांचा समावेश आहे. परिषदेत सहभागी होणाऱ्या तज्ज्ञांमध्ये कंपन्यांचे संस्थापक, गुंतवणूकदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील नेतृत्व, तंत्रज्ञांचा समावेश असणार आहे, अशी माहिती टीआयईचे जागतिक विश्वस्त व टायकॉन परिषदेचे अध्यक्ष किरण देशपांडे यांनी दिली.

याचबरोबर वाहननिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सुरक्षा, हवामान व शाश्वतता, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा, वेलनेस, डीप टेक यांसारख्या विषयांवरही परिषदेत ऊहापोह होईल. सध्या जगात सर्वांत चर्चेत असलेल्या कृत्रिम प्रज्ञा या विषयावर तीन सत्रे आहेत. यामध्ये कृत्रिम प्रज्ञेबद्दलचा दृष्टिकोन आणि उद्योजक या तंत्रज्ञानाचा कसा फायदा घेऊ शकतात, यावर भर देण्यात आला आहे. परिषदेतील नर्चर पॅव्हेलियनमध्ये टीआयई, पुणेने राबविलेल्या १३ नर्चर कार्यक्रमांमधील मार्गदर्शक व मार्गदर्शन प्राप्त करणाऱ्या कंपन्यांचे प्रदर्शन असेल. त्यांना गुंतवणूकदार, उद्योगातील नेतृत्व, प्रख्यात उद्योजकांशी संपर्क साधण्याची संधी मिळेल, असे देशपांडे यांनी सांगितले.

मार्गदर्शन कशाबाबत मिळणार?

  • उद्योगाच्या कल्पनेची पडताळणी करणे
  • बाजारपेठेतील धोरणे, विक्री, व्याप्ती वाढविणे
  • डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग करणे
  • डिझाईन थिंकिंग
  • गुंतवणूक आणि कंपनीला गुंतवणूक योग्य बनविणे
  • मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करणे
  • विलिनीकरण आणि अधिग्रहणासाठी नियोजन