पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. फरासखाना पोलीस, तसेच गुन्हे शाखेच्या दराेडा आणि वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी चोरट्यांकडून १४ दुचाकीसह एक सायकल जप्त केली. शहराच्या मध्यभागातून दुचाकी चाेरणारा आकाश हेरु कुंचन (वय २६, रा. बाटा गल्ली, बुधवार पेठ) याला अटक करण्यात अलाी. आराेपी आकाशने फरासखाना पोलीस ठाणे, तसेच ग्रामीण परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. वाहन चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी फरासखाना पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. आकाशने दुचाकी चोरीचे गुन्हे केले असून, तो बुधवार पेठेतील ढमढेरे गल्लीत थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी वैभव स्वामी, प्रवीण पासलकर, महेश राठोड यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.

चौकशीत त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चार दुचाकी आणि एक सायकल जप्त करण्यात आली. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित जाधव, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मेहबुब माेकाशी, तानाजी नागरे, नितीन तेलंगे, प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, महेश राठोड, नितीन जाधव, गजानन सोनुने यांनी ही कामगिरी केली.

गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्या आल्या. रियाज उर्फ डाड्या शार्दुल शेख (वय २१, रा. आमराई, कोकाटे चाळीजवळ, पाषाण), अनिल लिंगय्या भंडारी (वय ३४, रा. सुतारवाडी, पाषाण) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यंची नावे आहेत. शेख आणि भंडारी यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरल्याची माहिती पथकाला पोलिसांनी शेख आणि भंडारी यांना पकडले. त्यांच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमत पाच लाख ६० हजार रुपये आहे. आरोपींनी मुंढवा, हडपसर, बाणेर, कोथरूड, पिंपरी-चिंचवडमधील सांगवी, शिरगाव परंदवाडी, तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, अमित गद्रे, बाळू गायकवाड, अजित शिंदे, मनीषा पुकाळे, प्रदीप राठोड, गणेश ढगे यांनी ही कारवाई केली.

Story img Loader