पुणे : शहरातील नाना पेठ, सॅलिसबरी पार्क आणि धायरी परिसरातील लॉन्ड्री दुकान आणि दोन सदनिका फोडून साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरी गेला आहे. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. नाना पेठेतील सुनील सोनटक्के यांच्या लॉन्ड्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सात हजार रुपयांची गल्ल्यातील रोकड चोरी केली. हा प्रकार बुधवारी (१८ डिसेंबर) रोजी घडला आहे.

तर दुसरी घरफोडीची घटना सॅलिसबरी पार्क परिसरात घडली आहे. याबाबत शीला सुशील जैन (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (१८ डिसेंबर) दुपारी दीड ते अडीच वाजताच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी जैन यांच्या सदिकेतून ४ लाख ६२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरले. फिर्यादी जैन यांची सदनिका कुलूप लावून बंद असताना, चोरट्यांनी बनावट किल्लीने कुलूप उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने चोरी करून पळ काढळा. पोलीस उपनिरीक्षक कस्पटे पुढील तपास करीत आहेत.

pune police burglar arrested marathi news
‘डिलिव्हरी बॉय’च्या वेशात घरफोडी, करणाऱ्या चोरट्यासह साथीदार गजाआड, ८० लाखांच्या ऐवजासह पिस्तूल, काडतुसे जप्त
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Cash worth Rs 3 lakh stolen from school on Law College Road Pune news
पुणे: विधी महाविद्यालय रस्त्यावरील शाळेतून तीन लाखांची रोकड चोरी
Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
Burglary at Mayur Colony in Kothrud property worth Rs 4.5 lakh stolen
कोथरुडमधील मयूर कॉलनीत घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज चोरीला
fir against against five for selling nylon manja
नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे
pune gold jewellery stolen loksatta news
पुणे : कर्वेनगर भागातील बंगल्यात चोरी
kalyan Dombivli police
कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत

हेही वाचा : पुणे : बांधकाम व्यावसायिकाची चार कोटींची फसवणूक प्रकरणात फरार झालेली तरुणी गजाआड

तिसऱ्या घटनेत धायरी येथील बेनकर वस्ती परिसरातील गणेश भिकु कदम (वय ४९) यांच्या सदनिकेतून चोरट्यांनी १ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला. हा प्रकार १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत घडला आहे. सदनिकेचा कडी-कोयंडा कशाच्यातरी साह्याने उचकटून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील दागिने चोरले.

शेअर मार्केट ट्रेडींगचा फंडा, चौघांना ४२ लाखांचा गंडा

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी चौघांना ४१ लाख ६१ हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी, स्थानिक पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसापासून शहरात सायबर चोरट्यांनी नागरिकांना आपल्या जाळ्यात खेचून कोट्यावधींची आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. नागरिक देखील प्रलोभनाला बळी पडून आपली जमा पुंजी त्यांच्या हवाली करत आहेत.

हेही वाचा : समाविष्ट गावातीत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेचे मोठे पाऊल !

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यावर त्यांना चागंला परतावा देण्याचे बहाण्याने कोथरूड येथील ५८ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी १८ लाखाचा गंडा घातला आहे. पौड रस्ता येथील ४३ वर्षीय महिलेला शेअर ट्रेडींगमध्ये नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत १० लाख १५ हजार रुपये घेतले. मात्र त्यानंतर महिलेला नफा न देता गुंतवणूकही परत केली नाही.

शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने टिंगरेनगर येथील ५४ वर्षीय व्यक्तीची ९ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. तसेच वडगावशेरी येथील २७ वर्षीय व्यक्तीला ट्रेडींगचे वेगवेगळे टास्क देऊन ४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा गंडा घातला आहे.

Story img Loader