पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागातील रामटेकडी परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पुल परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. जगजीवन कोरंगा शेट्टी (वय ७४, रा. श्री हरिकृपा, कोरग्रावाडी, जि. उडपी, कर्नाटक) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत बेबी जगजीवन शेट्टी (वय ६९) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी राेजी सकाळी सातच्या सुमारास जगजीवन शेट्टी नवले पूल परिसरातून निगाले होते. कात्रजकडे जाणऱ्या रस्त्यावर भरधाव वाहनाने शेट्टी यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेट्टी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर शेट्टी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शेट्टी यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी तपास करत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा