पुणे : मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्या एकाला वडगाव मावळ न्यायालयातील सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी तीन वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दिलीप बबनराव घोडेकर (वय ५०, रा. मावळ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. घोडेकरविरुद्ध शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी दुकानातून दूध घेऊन येत होती. त्यावेळी घोडेकरने तिला अडवले आणि तिच्याशी अश्लील वर्तन केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील स्मिता चौगुले यांनी बाजू मांडली. साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून न्यायालायने घोडेकरला तीन वर्ष सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १५ हजार रुपये पीडित मुलीस द्यावे, असे न्यायालायने आदेशात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पुणे: पोर्शे अपघात प्रकरणात मोटारचालक अल्पवयीन मुलाच्या मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलले

देहूरोडचे विभागाचे तत्कालिन सहायक पोलीस आयुक्त देवीदास घेवारे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. गाडीलकर यांनी तपास केला. न्यायालयातील पोलिस हवालदार नितीन पवार यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune three years rigorous imprisonment to accused who molested a girl pune print news rbk 25 css
Show comments