पुणे : बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान चौक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सोमवारी (१७ जून) सकाळी सहानंतर बदल करण्यात येणार आहे. गोळीबार मैदान येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक) परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. गोळीबार मैदान चौकातून शंकरशेठ रस्तामार्गे स्वारगेटकडे जाणारा मार्ग सर्वप्रकारच्या वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी गोळीबार मैदान चौकातून वळून सीडीओ चौक, उजवीकडे वळून गुलटेकडीमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

हेही वाचा : चिंचवड विधानसभा : अश्विनी जगताप, शंकर जगताप पाठोपाठ चंद्रकांत नखाते भाजपमधून इच्छुक; घराणेशाहीला केला विरोध

सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारा रस्ता सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. कोंढवा, लुल्लानगरमार्गे येणाऱ्या वाहनांनी खटाव बंगला चौक, नेपीयर रस्ता, मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार, भैरोबा नाला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकाकडून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक पर्याची मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी सॅलसबरी पार्क, सीडीओ चौक, भैरोबानाला चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. सोलापूर रस्त्याने गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी मम्मादेवी चौक, बिशप स्कूलमार्गे किंवा नेपीयर रस्तामार्गे, सीडीओ चौकातून इच्छितस्थळी जावे.

हेही वाचा : धक्कादायक : पत्नीचा चाकूने गळा चिरून खून; सातारा रस्त्यावरील लॉजमधील घटना

सोलापूर रस्त्यावरील भैराेबानाला चौकातून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक वळविण्यात आली आहे. या भागातील वाहतूक एम्प्रेस गार्डन आणि लुल्लानगरकडे वळविण्यात येणार आहे. कोंढवा परिसरातून येणाऱ्या सर्व वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune traffic route changes at golibar maidan chowk due to bakri eid pune print news rbk 25 css