पुणे : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध मंदिरांच्या परिसरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक बदल करण्यात आले आहेत. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, श्री चतु:शृंगी मंदिर, भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर, तसेच सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. या भागातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सवात बुधवार पेठेतील श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी होते. गुरुवारपासून (३ ऑक्टोबर) अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकापर्यंतचा (हुतात्मा चौक) रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक दरम्यान एकेरी वाहतूक सुरु राहणार राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे. लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते श्री तांबडी जोगेश्वरी दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

हेही वाचा : जास्त पावसानंतर यंदा राज्यात थंडीचाही कडाका

सकाळ कार्यालयापासून श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अन्य वाहनांनासाठी बंद राहणार आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच शनिवार पेठेतील श्री अष्टभूजा मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी वाहने नदीपात्रातील रस्ता, मंडईतील वाहनतळावर लावावीत.

सेनापती बापट रस्त्यावरील श्री चतु:शृंगी मंदिर परिसरात गर्दी झाल्यास या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या भागात गर्दी वाढल्यास सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक वेताळबाबा चौकमार्गे दीप बंगला चौक, ओम सुपर मार्केटमार्गे वळविण्यात येणार आहे.

हेही वाचा : चिंचवड विधानसभा: अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार

भवानी पेठेतील श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहे. नेहरु रस्त्याने श्री भवानी माता मंदिराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नेहरु रस्ता ते श्री भवानी माता मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. गर्दी वाढल्यास नेहरु रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.

श्रीसुक्त पठणानिमित्त वाहतूक बदल

श्रीसुक्त पठणानिमित्त शुक्रवारी (४ ऑक्टोबर) सकाळी पाच ते सात दरम्यान सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार असून स्वारगेटकडून सारसबागमार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. मित्रमंडळ चौकाकडून पूरम चौकाकडे येणारा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मित्रमंडळ चौकातून येणाऱ्या वाहनांना सावरकर चौकातून सिंहगड रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे, तसेच सिंहगड रस्त्याने सावरकर चौकात येणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनारायण चौकातून इच्छितस्थळी जावे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.