पुणे : सकल मराठा समाजाकडून सोमवारी (२० नोव्हेंबर) खराडीतील महालक्ष्मी लाॅन येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला मनोज जरांगे उपस्थित राहणार आहेत. सभेला होणारी गर्दी विचारात घेऊन नगर रस्त्यावरील वाहतुकीत सोमवारी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकण,भोसरीमार्गे पुणे- मुंबईकडे जातील.

हेही वाचा : पुणे : मंगळवार पेठेत वैमनस्यातून तरुणाचा खून करून पसार झालेल्या आरोपीला अटक

नगर रस्त्यावरून हडपसर, सासवड आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनी केसनंदमार्गे थेऊर फाटा येथून इच्छितस्थळी जावे. सोलापूर रस्त्याने नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी थेऊर येथून इच्छितस्थळी जावे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाहनांनी भोसरी, चाकण, शिक्रापूरमार्गे जावे. वाघोली येथून पुण्याकडे येणाऱी वाहतूक बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

Story img Loader