पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त मंगळवारी मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक वळविण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…पुणे रेल्वे स्थानकातील यार्डात डब्याला आग

टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह, खंडोजीबाबा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, अलका चित्रपटगृह मार्गे इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे (हुतात्मा चौक) वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी कळविले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune traffic route changes on chhatrapati shivaji road due to ganesh jayanti pune print news rbk 25 psg