पुणे : घोरपडी परिसरात शाळकरी मुलगा कालव्यात बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कालव्यात बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पारस सचिन प्रसन्ना (वय १४, रा. घोरपडी) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. होळीच्या दिवशी घोरपडी परिसरातील कालव्यात पारस पोहायला गेला होता. पोहताना दमछाक झाल्याने तो बुडाला. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला नाही. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली.
हेही वाचा…पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची ५७ लाखांची फसवणूक
अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेऊन पारसचा मृतदेह सोमवारी सायंकाळी पाण्यातून बाहेर काढला. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
First published on: 26-03-2024 at 10:57 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune tragic drowning school boy s body recovered from ghorpadi canal pune print news rbk 25 psg