पुणे : मुळशी धरण परिसरात रविवारी फिरायला आलेले पिंपरी-चिंचवड परिसरातील दोन महाविद्यालयीन युवक बुडाल्याची घटना घडली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडालेल्या युवकांचा शोध घेण्यात येत आहे. अनिश राऊत (वय १८, रा. पिंपरी), विशाल राठोड (वय १७, रा. चिंचवड) अशी मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. पौड पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिश, विशाल हे एका महाविद्यलयात शिक्षण घेत आहेत. रविवारी अनिश, विशाल, त्यांचे मित्र गोविंद चाकली, जीत लोंढे, अथर्व राऊत, राज यादव, सोहम जाधव, आदित्य बाबर हे रविवारी सकाळी मुळशी धरण परिसरात फिरायला आले होते. चाचिवली-ढोकळवाडी परिसरात धरणाच्या पाणलोटात ते पोहण्यासाठी उतरले. त्या वेळी पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने अनिश आणि विशाल बुडाले. या घटनेची माहिती त्यांच्याबरोबर असलेल्या मित्रांनी ग्रामस्थांना दिली, त्यानंतर पौड पोलिसानी घटनास्थळी भेट दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा