पुणे : खेड तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय भिकेन दौड (वय २९, रा. सातकरस्थळ, ता. खेड, जि. पुणे), श्रीराम संतोष होले (वय २३, रा. होलेवाडी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांचा साथीदार किरण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींना आरोपी अजय आणि श्रीराम यांनी फिरायला नेण्याचा बहाणा करून शिरुर परिसरात नेले. तेथील एका डोंगरावर आरोपींचा मित्र किरण याने दोघींना इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा…पिंपरी : एका वर्षात अडीच हजार श्वानांचा मृत्यू
इंजेक्शन घेतले नाही तर सोडून जाऊ, अशी धमकी दिली. धमकीमुळे मुली घाबरल्या. किरणने दोघींना इंजेक्शन दिले. आरोपी अजय आणि श्रीराम यांनी दोघींना एका हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये दोन खोल्या घेतल्या. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घाबरलेल्या मुलींनी ही बाब लपवून ठेवली होती. आरोपींनी दोघींना पुन्हा धमकावले. घाबरलेल्या मुलींना खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू करण्यात आला.
हेही वाचा…मुंबईला ३ वर्षे पुरेल एवढ्या पाण्याची वाफ!
खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, उपनिरीक्षक माधवी देशमुख, डी. एन. राऊत, रामदास बोऱ्हाडे, प्रवीण गेंगजे, एस. डी. बांडे, स्वप्नील लोहार, सागर शिंगाडे, निलम वारे यांनी पसार झालेल्या दोघा आरोपींना अटक केली.