पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार राज्यातील विद्यार्थ्यांना कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांकडून कार्य प्रशिक्षण कक्ष (इंटर्नशिप सेल) स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षामध्ये समन्वयक अधिकाऱ्यासह चार सदस्यांची समिती नेमावी लागणार आहे. विद्यार्थी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून या कक्षाला काम करावे लागणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्य प्रशिक्षणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे प्रसिद्ध केल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वर्गात अनुभवता न येणाऱ्या औद्योगिक वातावरणाची ओळख करून देणे, उद्योगांसाठी आवश्यक विश्लेषणात्मक, व्यवस्थापकीय कौशल्ये प्राप्त करण्याची संधी देणे, प्रत्यक्ष अनुभवातून व्यावसायिक, संप्रेषण, व्यावसायिक नैतिकता अशी कौशल्ये शिकण्याची संधी देणे, रोजगार किंवा संशोधनामध्ये संधी उपलब्ध करणे हा कार्य प्रशिक्षणाचा उद्देश आहे. त्यासाठी सत्रनिहाय आठ ते बारा श्रेयांक निश्चित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ, महाविद्यालयात कार्य प्रशिक्षण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : आरोग्यासाठी पाठवा पत्रे! जन आरोग्य अभियानाकडून मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना मोहीम

Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
GAIL India Recruitment 2024
GAIL India Recruitment 2024 : सिनिअर इंजिनिअरच्या पदासाठी मागवले अर्ज, १,८०,०००पर्यंत मिळू शकतो पगार
job opportunity in ordnance factory update in marathi
नोकरीची संधी :ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
TET, AI, TET malpractices, TET news, TET latest news,
‘टीईटी’वर आता एआय ठेवणार नजर… गैरप्रकार रोखण्यासाठीच्या उपाययोजना काय?

शासनाच्या निर्णयानुसार विद्यापीठे, महाविद्यालयांनी त्यांच्या परिक्षेत्रातील उद्योग, व्यावसायिक आस्थापना, वित्तीय संस्था, बँक, अशासकीय संस्था यांच्याशी समन्वय साधण्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला कार्य प्रशिक्षण कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे. या कक्षात समन्वयक अधिकारी, सहायक समन्वयक, विद्याशाखानिहाय समन्वयक, विद्यार्थी समन्वयक यांचा समावेश असेल. समन्वयक अधिकारी शैक्षणिक वर्षातील कार्य प्रशिक्षणाची प्रगती, तपशील कुलगुरू, प्राचार्यांना सादर करतील. या कक्षाने दर वर्षी विद्यार्थ्यांना कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या पसंतीच्या संस्थांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, उद्योगांशी दीर्घकालीन सहकार्यासाठी सामंजस्य करार करणे, विषयतज्ज्ञ, उद्योग, संघटना, मार्गदर्शक, प्राध्यापक सदस्यांची नोंदणी करण्यासाठी आणि ती माहिती विद्यार्थ्यांना पाहता येण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करावी, कार्यप्रशिक्षण पूर्वतयारीचे वर्षभर कार्यक्रम करावेत, राष्ट्रीय उच्च शिक्षण आराखड्यानुसार विद्यार्थ्यांच्या कार्य प्रशिक्षणाचे मूल्यमापन, एकसमान नोंद याबाबत कार्य प्रशिक्षण कक्ष काम करेल, असे नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांचे कार्य प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सर्वसमावेशक अहवाल तयार करायचा आहे. त्या अहवालावर पर्यवेक्षक, समन्वयक अधिकारी, मार्गदर्शक शिक्षक स्वाक्षरी करतील. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कार्य प्रशिक्षणातील अनुभवावर सादरीकरण करावे लागेल. त्या सादरीकरणावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.