पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार राज्यातील विद्यार्थ्यांना कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांकडून कार्य प्रशिक्षण कक्ष (इंटर्नशिप सेल) स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षामध्ये समन्वयक अधिकाऱ्यासह चार सदस्यांची समिती नेमावी लागणार आहे. विद्यार्थी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून या कक्षाला काम करावे लागणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कार्य प्रशिक्षणाबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे प्रसिद्ध केल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वर्गात अनुभवता न येणाऱ्या औद्योगिक वातावरणाची ओळख करून देणे, उद्योगांसाठी आवश्यक विश्लेषणात्मक, व्यवस्थापकीय कौशल्ये प्राप्त करण्याची संधी देणे, प्रत्यक्ष अनुभवातून व्यावसायिक, संप्रेषण, व्यावसायिक नैतिकता अशी कौशल्ये शिकण्याची संधी देणे, रोजगार किंवा संशोधनामध्ये संधी उपलब्ध करणे हा कार्य प्रशिक्षणाचा उद्देश आहे. त्यासाठी सत्रनिहाय आठ ते बारा श्रेयांक निश्चित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ, महाविद्यालयात कार्य प्रशिक्षण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना सहजपणे मिळणार इंटर्नशिप! विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये आता इंटर्नशिप सेल!
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार राज्यातील विद्यार्थ्यांना कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांकडून कार्य प्रशिक्षण कक्ष (इंटर्नशिप सेल) स्थापन करण्यात येणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-02-2024 at 13:19 IST
TOPICSपुणे न्यूजPune Newsमराठी बातम्याMarathi Newsमहाविद्यालयीन विद्यार्थीCollege Studentsविद्यापीठUniversityशिक्षणEducation
+ 1 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune universities and colleges will start internship cell to give internship to students as per nep 2020 pune print news ccp 14 css