पुणे : माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०) यांच्या खूनप्रकरणातील तब्बल २१ आरोपींवर पुणे पोलिसांनी मोक्कानुसार (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) कारवाई केली आहे. सोमा गायकवाड टोळीचा म्होरक्या असून, यामध्ये तीन अल्पवयीन मुलांसह वनराज यांच्या बहिणीचा आणि तिच्या पतीचा समावेश आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टोळी प्रमुख कुख्यात गुन्हेगार सोमा ऊर्फ सोमनाथ सयाजी गायकवाड (रा. आंबेगाव पठार) तसेच संजीवनी जयंत कोमकर (रा. ३०९, नाना पेठ) जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२), भाचा प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर (३७), अनिकेत दूधभाते, तुषार उर्फ आबा कदम, सागर पवार, सॅम ऊर्फ समीर काळे, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांच्यासह १८ जणांना अटक तर, तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. समर्थ पोलिसांत वनराज यांचे वडील सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर (वय ६८) यांनी तक्रार दिली आहे.

हे ही वाचा… गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पिंपरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; पिंपरी, चिंचवडमधील वाहतुकीत ‘असा’ आहे बदल!

वनराज आणि संजीवनी बहिण भाऊ आहेत. जयंत कोमकर हा संजीवनी हिचा पती आहे. तर गणेश कोमकरचे आंदेकरच्या सर्वात धाकट्या मुलीशी लग्न झालेले आहे. वनराजचे सख्खे मेव्हणे आहेत. तर, प्रकाश हा सख्खा भाचा आहे. त्यांच्यात आर्थिक वाद होते. घटनेच्या दोन दिवस आधीच संजीवनी यांच्या दुकानावर अतिक्रमणबाबत कारवाई झाली होती. कारवाई वनराज यांच्या सांगण्यावरून केल्याचा संशय संजीवनीला होता. त्याचा राग त्यांच्या मनात धरून १ सप्टेंबर रोजी वनराज हे घराजवळ चुलत भाऊ शिवम याच्यासोबत उभारले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केला होता. यानंतर पोलिसांनी एकूण १८ जणांना अटक केली. तर, ८ पिस्तूल तसेच १३ जिवंत काडतूसे, मोटार आणि ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. खून आर्थिक वाद, कौटुंबिक वादासोबतच एक वर्षांपूर्वी झालेल्या निखिल आखाडे यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी झाल्याचे तपासात समोर आले आहे.

हे ही वाचा… विद्यापीठाच्या आवारात पुन्हा चंदन चोरी- शहरात चंदन चोरट्यांचा धुमाकूळ

अनेक प्रयत्न फसले..!

वनराज यांच्यावर सोमा गायकवाड याच्या टोळीने अनेकवेळा हल्ला करण्याचा प्रयत्ने केला. पण, तो काही ना काही कारणांनी फसत होता. शेवटी १ सप्टेंबर रोजी हल्ला केला. दरम्यान, आरोपींनी एकत्रित पैसे जमाकरून शस्त्रसाठा आणला होता. ते वनराज यांच्यावरच पाळत ठेवून होते. वनराजच आंदेकर टोळीची ‘सपोर्ट सिस्टीम’ आहे, असा समज घेऊन त्यांना वनराज यांचा खून केला. त्यात आर्थिक पुर‌वठा, निखील आखाडेच्या आरोपींचे न्यायालयीन कामकाजासाठी लागणारा पैसा व इतर गोष्टी यामुळे हा खून झाल्याचेही समोर आले आहे

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune vanraj andekar murder case mokka against 21 accused pune print news vvk 10 sud 02