वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन जवळपास आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.या आठ दिवसामध्ये वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहे.त्यामुळे पुणे लोकसभा वसंत मोरे हे कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढणार की अपक्ष म्हणून लढणार हे चित्र अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. दरम्यान महायुतीकडून भाजपचे नेते माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.पण महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत उमेदवार झाला नाही. त्यामुळे येत्या काळात महाविकासकडून वसंत मोरे उमेदवार असणार की अन्य दुसरा उमेदवार असणार अशी चर्चा पुणे शहराच्या राजकारणात सुरू आहे. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधून भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी वसंत मोरे म्हणाले “वसंत मोरेचं पुढंच राजकीय भविष्य उज्वलंच आहे. मी थोडासा वेळ घेतोय,पण माझी वेळ चुकलेली नाही.कारण पुणे लोकसभा निवडणुक ही चौथ्या टप्प्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेस पक्षाचे नेते या सर्व पक्षातील नेत्यांच्या भेटीसाठी घेतल्या आहेत.तसेच अद्याप महाविकास आघाडीमार्फत कोणतीही यादी जाहीर झाली नाही. त्या यादीला किमान दोन चार दिवस लागतील”.

हेही वाचा… Maharashtra News Live: राज ठाकरेंचा दिल्ली दौरा, महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आणि महत्त्वाच्या घडामोडी

महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढणार का प्रश्नावर मोरे म्हणाले की, मला उमेदवारी मिळावी यासाठी सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यामुळे मला निश्चित उमेदवारी मिळेल, माझ्या समोर मुरलीधर मोहोळ उमेदवार असले तरी मी एक नंबरची मतं घेऊन विजयी होईल. ज्या ज्या वेळी माझ्या आयुष्यात संघर्षाला सामोरे जावं लागलं आहे त्यावेळी मोठा विजय प्राप्त केला आहे. ही निवडणुक माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारा हा विषय असणार आहे.त्यामुळे मी यातून नक्कीच मार्ग काढेल आणि विजयी होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा…. पुणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ८५ जणांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश

वसंत मोरेच्या उमेदवारीमुळे काय फरक पडेल हे पुणेकर दाखवून देतील

पुणे लोकसभेची निवडणुक वसंत मोरे यांनी लढविली. तरी काही फरक पडणार नसल्याचं विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केले. त्या प्रश्नावर वसंत मोरे म्हणाले की काही महिन्यापुर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील यांनी भाजपात येण्याची ऑफर दिली होती की,तुम्ही भाजपात या,नक्की निवडून येताल असे सांगितले होते. त्यावेळी मी तिथेच चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते.मी आजवर भाजप विरोधात निवडणुक लढवली आहे आणि त्या प्रत्येक निवडणुकीत मला यश मिळाले आहे.त्यामुळे वसंत मोरेच्या उमेदवारीमुळे काय फरक पडेल हे पुणेकर दाखवून देतील अशा शब्दात भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना वसंत मोरे यांनी टोला लगावला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune vasant more said he is taking time for lok sabha election 2024 but the timing is not wrong svk 88 asj
Show comments