पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियमित तिमाही बैठकीसाठी आज (शुक्रवारी) माजी केंद्रीय मंत्री, इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील एकाच व्यासपीठावर येणार होते. पण अजित पवारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नियमित तिमाही बैठक आज, शुक्रवारी होती.

हेही वाचा : गणेशोत्सवात तीन दिवस मद्यविक्री बंद

या बैठकीसाठी शरद पवार, दिलीप वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे आदी कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार होते. मात्र, या बैठकीकडे अजित पवार यांनी पाठ फिरवली असल्याचे समोर आले आहे. अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, ते सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथील नियोजित कार्यक्रमासाठी जाणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Story img Loader