पुणे : पावसाळा सुरू झाल्याने पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी होत असल्याने दर तेजीत आहेत. पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून, किरकोळ बाजारात कोथिंबिर, मेथीच्या एका जुडीचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत आहेत. अन्य पालेभाज्यांच्या जुडीचे दर ३० रुपयांपर्यंत आहेत. महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “समुद्र नसल्याची पुणेकरांना खंत, म्हणून भाजपाने…”, पहिल्या पावसानंतरची दयनीय स्थिती पाहून जयंत पाटलांचा टोला

कोथिंबिर, मेथी, कांदापातीच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिर एक लाख जुडी, मेथीची ३० हजार जुड्यांची आवक झाली. घाऊक बाजारातील पालेभाज्यांच्या शेकडा दरांमध्ये कोथिंबीर १५०० ते ३५००, मेथी १५०० ते २५००, शेपू ८०० ते १५००, चाकवत ८०० ते १५००, करडई ४०० ते १०००, पुदिना ५०० ते १०००, अंबाडी ४०० ते ८००, मुळा ८०० ते २०००, राजगिरा ४०० ते ७०००, चुका ६०० ते १०००, चवळई ४०० ते ७००, पालक १५०० ते २००० रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.