पुणे : घरफोडीचे १५० हून जास्त गुन्हे दाखल असलेला चोरटा जयवंत उर्फ जयड्या गायकवाडला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून घरफोडीचे दोन उघड झाले असून, चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जयवंत उर्फ जयड्या गो‌‌‌वर्धन गायकवाड (वय ३८, रा. डाॅ. आंबेडकर वसाहत, ओैंध) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गायकवाड याच्याविरुद्ध घरफोडीचे १५० हून जास्त गु्न्हे दाखल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील मध्यभागात झालेल्या घरफोडीचा तपास विश्रामबाग पोलिसांकडून करण्यात येत होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. गायकवाडने घरफोडी केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. तपासात त्याने घरफोडीचे दोन गुन्हे केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा : जयंत पाटील यांनी गृहमंत्र्यांचे आभार का मानले?

पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठाेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके, उपनिरीक्षक मनोज बरुरे, सहायक फौजदार राकेश गुजर, रेवण कंचे, अशोक माने, मयूर भोसले, गणेश काठे, महावीर वलटे, आशिष खरात, अर्जुन थोरात यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune vishrambag police arrested a thief jaydya who did more than 150 burglary pune print news rbk 25 css