पुणे : प्रसुतीसाठी चाकण येथील माहेरी गेलेल्या गर्भवती महिलेने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मतदान केले. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी या महिलेसाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था केल्याने या महिलेला शिवाजीनगर मतदारसंघातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान झाले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक प्रशासनाने मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, गर्भवती महिलांना सुलभरित्या मतदानाचा हक्क बजावता आला. शालू राठोड ही महिला प्रसुतीसाठी चाकण येथे माहेली गेली होती. त्यांचे नाव शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत होते. प्रसुतीची तारीख १४ मे असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल व्हायचे होते. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांनी मतदान करण्याची इच्छा प्रशासनाकडे व्यक्त केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या सुचनेनुसार उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी राठोड यांच्यासाठी चाकण ते शिवाजीनगर या प्रवासासाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यामुळे राठोड यांनी दुपारी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात त्या प्रसूतीसाठी दाखल झाल्या.

Chandrapur marathi news
एकदाच मतदान करण्याचा अधिकार…पण, या गावात मात्र दोन वर्षांत चौथ्यांदा…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Belapur, Airoli, voters, society Belapur,
१५ हजार मतदारांचे सोसायटीतच मतदान, बेलापूरमध्ये १२ तर ऐरोलीत २ गृहसंकुलांत केंद्रे
Children, illegal marriage, birth registration,
अवैध विवाहातून जन्मलेल्या अपत्यांनाही जन्मनोंदणीचा हक्क
MVA Five Big Promises For Maharashtra
MVA : महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीने दिलेली पाच प्रमुख आश्वासनं काय? महिलांना किती पैसे दिले जाणार?
Nashik district 196 candidates in 15 constituencies two voting machines needed in Malegaon, Baglan, Igatpuri
मालेगाव बाह्य, बागलाण, इगतपुरीत दोन मतदान यंत्रांची गरज
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Chandrapur district six constituencies, Chimur,
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत केवळ आठ महिला उमेदवार; चिमूर, ब्रम्हपुरीत एकही महिला रिंगणात नाही

हेही वाचा : मतदान सुरू असतानाच बॉम्बस्फोटाची धमकी; पत्नीला नांदायला येत नसल्याने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी

शतकोत्तर मतदार

शिरुर विधानसभा मतदारसंघात पिंपळे जगताप केंद्रावर १०६ वर्षांच्या रखमाबाई शेळके, १०५ वर्षांच्या अनुसया सोंडेकर यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ९८ वर्षाच्या विमला शिंगणे, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील ९८ वर्षाच्या लक्ष्मीबाई गराडे, ९० वर्षाच्या कलावती कांबळे यांनीही मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.