पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जया रमेश ससाणे (वय ३४, रा. पत्र्याची चाळ, जयभीम मित्र मंडळाजवळ, भवानी पेठ) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रमेश बबन ससाणे (वय ४३) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पुणे : पाषाण-सूस रस्त्यावर अपघात; संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू

रविवारी रमेश ससाणे कामावरुन घरी जेवण करण्यासाठी आले. त्यावेळी जयाने त्यांच्याकडे ५०० रुपये मागितले. पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तिने जेवण वाढताना ताट आणि तांब्या आपटला. त्यामुळे रमेश यांनी तिला चापट मारली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. जयाने रमेश यांचा दंड आणि पाठीवर चाकूने वार केले. सहायक फौजदार भाेसले तपास करत आहेत.