पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दाखल केली असून सायबर चोरट्यांविरुद्ध तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नारायण पेठेत राहायला आहे. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी मे महिन्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविण्यात आला होता. चोरट्याने त्यांना गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर चोरट्याने त्यांना एका समाज माध्यमातील समूहात घेतले. समूहात शेेअर बाजारातील विविध योजनांची माहिती दिली.

महिलेने चोरट्याने दिलेल्या बँक खात्यात पैसे गुंतविले. सुरुवातीला महिलेला परतावा मिळाल्याने तिचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्याने महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. महिलेने चोरट्याच्या खात्यात ३२ लाख रुपये जमा केले. महिलेला परतावा देण्यात आला नाही. महिलेने चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्यचे लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune woman defrauded for rupees 32 lakhs with the lure of investment in stock market pune print news vvk 10 css